For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हाधिकाऱ्यांची सिटी सर्व्हे कार्यालयाला भेट

06:32 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाधिकाऱ्यांची सिटी सर्व्हे कार्यालयाला भेट
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शहरातील सिटी सर्व्हे कार्यालयाला भेट देऊन कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध महसूल सेवा, जमीन व मालमत्ता नोंदी, सर्व्हे प्रकरणे आदींची माहितीही अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच सदर कार्यालय जुने असून याची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्याची सूचनाही त्यांनी डीडीएलआर अधिकाऱ्यांना दिली.

सिटी सर्व्हे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना विविध कामांसाठी अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी अर्जांची वेळेत छाननी करून प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा. नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे प्रभावीपणे निराकरण करून त्यांना आवश्यक माहिती व सेवा सुलभपणे उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

जमिनीच्या मोजणीसह मालमत्ता नोंदी, हक्कविषयक कागदपत्रे व इतर सर्व्हे कामांमध्ये पारदर्शकता राखण्यात यावी. कार्यालयातील अभिलेख व नोंदी अद्ययावत ठेवण्याबरोबरच डिजिटल पद्धतीने उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रभावी वापर करण्यात यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती घेण्यात आली.

Advertisement
Tags :

.