कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्गातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार

11:17 AM Sep 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आश्वासन

Advertisement

मालवण / प्रतिनिधी

Advertisement

पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा स्वदेश दर्शन 2.0 या मध्ये समाविष्ट असून त्या माध्यमातून बीच टुरिझम ,ऍग्रो,हिस्ट्री,मेडिकल,फॉरेस्ट,मँग्रोज,धार्मिक टुरिझम साठी सर्वसमावेशक विकास आराखडा बनविण्याची विनंती करण्यात आली .यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार तसेच जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी आवश्यक मुद्यांचे प्रस्ताव बनून द्या .त्याप्रमाणे पर्यटन वाढीसाठी कार्य करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास ही सहकार्य करणार असे सांगितले अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णु मोंडकर यांनी दिली. यावेळी सहदेव साळगावकर ,रविंद्र खानविलकर ,मंगेश जावकर, देवानंद लोकेगावकर,रामा चोपेड़ेकर ,जीवन भोगावकर,मनोज खोबरेकर, क्यालिस फ़र्नाडिस आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update #konkan update # District Collector Trupti Dhodamise#sindhudurg # tourism #
Next Article