मसुरेत उद्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
मसुरे । प्रतिनिधी
नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या आयोजनाखाली आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने दि.8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मसुरे डांगमोडे, रवळनाथ मंदिर येथे श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वरिष्ठ गट पुरुष / महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमधून निवडलेले पुरुष / महिला संघ ठाणे येथे दिनांक १९ ते २३ मार्च या कालावधीत आयोजित होणाऱ्या ७१ व्या वरीष्ठ गट पुरुष / महिला अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत . जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या पुरुष व महिला या दोन्ही गटासाठी प्रथम क्रमांक 7000 व चषक, द्वितीय क्रमांक 5000 व चषक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व अष्टपैलू खेळाडूंना प्रत्येकी 500 रुपये व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व चषक कै. शिवाजी गंगाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत करण्यात आले आहेत. स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडू आणि सहभागी कबड्डी हितचिंतक यांची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते होणार सायंकाळी ठीक ६ वाजता होणार असून यावेळी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश जी राणे साहेब , शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत ,शिवसेना नेते संजय आंग्रे, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे चे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संघ निश्चिती व अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह श्री नितीन हडकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन स्पर्धा संयोजन समितीने केले आहे .मो. 7249357239,