For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन

07:55 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन
District BJP's protest against the Congress
Advertisement

काँग्रेस विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली राजकीय लाभ घेत असल्याचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट

Advertisement

प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

बेंगळूर येथील केपीसीसी कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान भाजपचे आमदार बी. बी. हरीश यांच्यावर अंडीफेक झाल्याच्या घटनेचा निषेध करत भाजपने शुक्रवारी राज्यभर आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव भाजपच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली.

सकाळी राणी चन्नम्मा चौकात निदर्शन करून मोर्चा काँग्रेस कार्यालयाकडे रवाना झाला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चाला अडविले. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये काहीकाळ धक्काबुक्की झाली. त्यानंतर भाजप नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून काँग्रेसचा निषेध केला.

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणावरून काँग्रेस देशभरातील विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. युवकांच्या भावना भडकवून केंद्र सरकारला लक्ष्य करण्यासाठी आंदोलनांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच या आंदोलनांना परदेशातून आर्थिक मदत मिळत असून देशात अराजकता निर्माण करून केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला.

नीट प्रश्नपत्रिका फुटणे ही केवळ एका राज्यापुरती मर्यादित नसून यापूर्वीही विविध राज्यांत अशा घटना घडल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने अशाप्रकारची आंदोलने केली नव्हती. मग आता राजकीय हेतुने आंदोलन का केले जात आहे?, असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी बेळगावमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. आंदोलनाच्या नावाखाली वैयक्तिक टीका व चिथावणीखोर घोषणाबाजी सहन केली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार महांतेश दो•गौडर, माजी आमदार विश्वनाथ पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, सोनाली सरनोबत, नगरसेवक गिरीश धोंगडी, महानगर अध्यक्षा गीता सुतार, नगरसेवक श्रेयस नाकाडी, उज्ज्वला बडवाण्णाचे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.