आमदार सेठ यांच्याकडून दिव्यांगांना दुचाकी
11:59 AM May 28, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : आमदार असिफ सेठ यांच्यावतीने दिव्यांगांना दुचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. बॉक्साईटजवळील त्यांच्या कार्यालयात दुचाकी वाहन वितरणाचा कार्यक्रम पार पडला. दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी वाहने महत्त्वाची ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवा नेते अमन सेठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिव्यांग व्यक्तींना आधार मिळावा यासाठी हिरो कंपनीच्या दुचाकी त्यांना देण्यात आल्या. दिव्यांगांनी आमदार सेठ यांचे आभार मानले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article