पंचायत समित्यांना वाहनांचे वितरण
जिल्हा परिषदेत पार पडला वितरण सोहळा
सहा पंचायत समित्यांकडे वाहने केली सुपूर्द
कोल्हापूर
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रविवारी सहा पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे ‘बोलेरो’ या चार चाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. पंचायत समिती आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल ,शिरोळ यांना वाहने वितरीत केली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांना गावपातळीवर भेटी देण्यासाठी वाहनांची खरेदी करणेत आली. ही वाहने जिल्हा परिषद स्तरावर जि.प.च्या घसारा निधीतून खरेदी केली. वाहनांचे वितरण झाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सीईओ कार्तिकेयन एस.,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) अरूण जाधव, प्रकल्प संचालक, माधुरी परिट कार्यकारी (पाणी व स्वच्छता), मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सांगावकर,जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द पिंपळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकर तसेच आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल ,शिरोळ या तालुक्यातील सर्व गट विकास अधिकारी व मुख्यालयातील अधिकारी ,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.