महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रोटरी क्लबच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त गरजूंना उपयुक्त साहित्याचे वितरण

10:33 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गरजू व्यक्तींना उपयुक्त साहित्याचे वितरण करण्यात आले. मेसॉनिक हॉल येथे नुकताच हा कार्यक्रम झाला. अध्यक्ष म्हणून प्रांतपाल नासीर बोड्रावाला, प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रांतपाल रेणू कुलकर्णी, क्लबचे अध्यक्ष सतीश नाईक उपस्थित होते. गेली 30 वर्षे बेळगावमध्ये सकाळ, संध्याकाळ नाष्टा वितरित करणाऱ्या रिता स्वामी यांचे वाहन खराब झाल्याने त्यांना नवीन वाहन नासीर यांच्या हस्ते देण्यात आले. बसाप्पा सिद्दन्नावर या 70 वर्षीय व्यक्तीला श्रवण यंत्र देण्यात आले. यावेळी नासीर यांनी रोटरीने सातत्याने लोकोपयोगी कामे करण्याचा परिपाठ ठेवला आहे, असे सांगितले. यावेळी माजी संस्थापक सदस्य श्रीराम कट्टी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कट्टी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. रेणू कुलकर्णी यांनी क्लबच्या कार्याची प्रशंसा केली. सूत्रसंचालन एस. व्ही. देसाई यांनी केले. याप्रसंगी सचिव गुलाबचंद चौगुले, माजी प्रांतपाल आनंद सराफ, उदयसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article