महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निम्मे वर्ष संपले तरी गणवेश मिळेना...मनपा शाळेतील 10 हजार विद्यार्थी दुसऱ्या गणवेशापासून वंचितच

05:31 PM Sep 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
KMC
Advertisement

पहिला गणवेश मापात बसेना, दुसऱ्या गणवेशाचे कापड मिळेना; शासनाकडून गणवेशाचा तिढा कायम : पालकांच्या खिशाला भुर्दंड

इम्रान गवंडी कोल्हापूर

चालू शैक्षणिक वर्षी महापालिका शाळेतील मुलांना पहिल्या दिवशी गणवेश वाटप करण्याचे काटेकोर नियोजन झाल्याचा गाजावाजा केला होता. प्रत्यक्षात मात्र, निम्मे वर्ष संपत आले तरी स्काऊट व गाईडच्या दुसरा गणवेश मिळालेला नाही. अद्यापही राज्य शासनाकडून दुसऱ्या गणवेशाचे कापड प्राप्त झाले नसल्याने महापलिकेच्या 58 शाळांतील 10 हजार 571 विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.

Advertisement

यंदा राज्य शासनाने दोन्ही गणवेश खरेदीसाठी केंद्रीय पद्धत राबवली. त्यांतर्गत महिला आर्थिक महामंडळाकडून कापड खरेदी करून त्यांच्या अखत्यारीत बचत गटाकडून गणवेश शिवून घेण्याचे नियोजन केले. ठरलेल्या नियोजनानुसार गणवेश शिवूनही घेतले. शाळा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी ऑगस्टमध्ये पहिला गणवेश तयार करून शाळेला दिला. मात्र, हा गणवेशही विद्यार्थ्यांना मापात बसत नसल्याने मोठा घोळ झाला. गणवेश पुन्हा शिऊन घ्यावा लागल्याने काही पालकांना भुर्दंडही बसला. पहिल्या गणवेशाबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या. गणवेश मापात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जुन्या गणवेशावरच वर्ष घालवले. आता दुसरा गणवेश तरी मापात मिळणार का, असा प्रश्न आहे.

Advertisement

पहिला गणवेश वाटपामध्ये शासानाला अपयश आल्याने दुसरा गणवेश वाटपाची जबाबदारी पुर्वीच्या पद्धतीनुसार प्राथमिक शिक्षण मंडळाकडे सोपवली आहे. पण त्यातही शासन अपयशी ठरत आहे. शासनाने अद्याप महापलिका प्राथमिक शिक्षण मंडळाला कापडच दिले नसल्याने विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पहिला गणवेश बसेना, दुसरा गणवेश मिळेना, अशी स्थिती आहे.

यावर्षी गणवेश मिळणार का..?
निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी मनपा प्रशासनाला दुसऱ्या गणवेशाचे कापड मिळालेले नाही. कापड मिळाल्यानंतर ते शिवून घेण्यासाठी किती कालावधी लागणार, हे सांगता येत नाही. त्यामुळे यावर्षी गणवेश मिळणार का? हा प्रश्न आहे.

पुर्वीचीच पद्धत बरी
दरवर्षी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून कापड प्राप्त होताच शाळेला कापडाचा तागा दिला जायचा. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती नियोजनानुसार संबंधित ठेकेदाराकडून गणवेश शिवून घेत होती. यंदा शासनाने बदल केल्यामुळे गणवेशाचा तिढा वाढतच आहे. त्यामुळे पुर्वीचीच पद्धत बरी अशीच प्रतिक्रिया पालक व शिक्षकांतून व्यक्त होत आहेत.

मुलांचे कापड प्राप्त
राज्य शासनाकडून दुसऱ्या गणवेशासाठी मुलांचे कापड प्राप्त होऊन महिना झाला आहे. पण अद्यापही मुलींचे कापड मिळालेले नाही. दोन्ही गणवेश एकत्र शिवून घ्यावे लागतात. मुलींचे कापड मिळाले नसल्याने मुलांचे गणवेश शिवून घेण्याचे काम थांबले आहे.

दुसरा गणवेश लवकरच मिळेल
मुलींच्या गणवेशाचे कापड दोन दिवसात प्राप्त होणार आहे. कापड मिळताच नियोजन करून त्वरित गणवेश शिवून घेण्याची कार्यवाही केली जाईल. शिलाईचे काम शाळा व्यवस्थापन स्तरावर केली जाणार असल्याने लवकरच विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळेल.
रसुल पाटील, सहाय्यक प्रकल्प आधिकारी, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ

 

Advertisement
Tags :
distribution of uniformsmunicipal school children
Next Article