कुडाळात अंध बांधवांना छत्री व टी- शर्टचे वाटप
कुडाळ -
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ ( महाराष्ट्र ) कोकण विभागीय शाखेच्यावतीने अमेरिकास्थित पहिल्या अंध मूकबधिर पदवीधर महिला हेलन केलर याची जयंती कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. अंध बांधवांना मान्यवरांच्या हस्ते छत्र्या व टी शर्टचे वाटप करण्यात आले. तर या बांधवांच्या पाल्याना शैक्षिणक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत , कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर, उद्योजक संभाजी पवार ( कुडाळ ) , बाबल पावसकर ( पावशी ) अँड विशाल देसाई, डॉ संजय जोशी ,राष्ट्रीय दृष्टीहीन संघ ( महाराष्ट्र )चे विभागीय शाखा कोकणचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सचिव शेखर आळवे,खजिनदार नदा सावंत, सहसचिव शामसुंदर माजगावकर उपस्थित होते.
अंध बांधवांना अमित सामंत व आमदार वैभव नाईक यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या छत्र्यांचे वाटप श्री सामंत व मांजरेकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संभाजी पवार यानी अंध बांधवांना टी शर्ट दिली ,तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने या बाधवांच्या पाल्यासाठी शैक्षिणक साहित्य देण्यात आले. मान्यवरांनी आपले या संस्थेच्या पुढील उपक्रमांनाही सहकार्य राहील,अशी ग्वाही दिली. सौ सेजल आळवे, सदानंद पावले, अनिल शिंगाडे,प्रकाश वाघ,संजय लोणकर, प्रशांत कदम, सुरेश दामले,संतोष दळवी, जीवन ज्योत असोसिएशन (गोवा ) अध्यक्ष कमलाकांत शिरोडकर यांच्यासह अंध बांधव उपस्थित होते.