For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जिल्ह्यात पहिल्या इलेक्ट्रिक व्हील लोडरचे वितरण

03:08 PM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्ह्यात पहिल्या इलेक्ट्रिक व्हील लोडरचे वितरण
Advertisement

लिगाँग इंडिया प्रा. लि.कडून निर्मिती : गोकुळ पॉवर सर्व्हिसेस अधिकृत वितरक 

Advertisement

बेळगाव : लिगाँग इंडिया प्रा. लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रात अवजड यंत्रसामग्रीसाठी विश्वासार्ह ब्रँड आहे. लिगाँग कंपनीचे उत्तर कर्नाटकातील गोकुळ पॉवर सर्व्हिसेस हे अधिकृत डीलर आहेत. पर्यावरण प्रदूषण टाळण्यासोबत इंधनाची बचत करणाऱ्या लिगाँग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इलेक्ट्रीक व्हील लोडर बनविला आहे. खडी मशीन, खाणकामासाठी याचा वापर होतो. बेळगाव जिल्ह्यात दि. 21 फेब्रुवारी रोजी गोकुळ पॉवर सर्व्हिसेसकडून पहिल्या इलेक्ट्रीक व्हील लोडरचे वितरण करण्यात आले. गोकुळ पॉवर सर्व्हिसेस ही कंपनी गेल्या 26 वर्षांपासून बेळगावात जनरेटरची विक्री करत आहे.

इलेक्ट्रीकल इंजिनिअर जगन्नाथ कुलकर्णी हे या कंपनीचे एमडी (व्यवस्थापकीय संचालक) आहेत. सध्या गोकुळ पॉवर सर्व्हिसेस कंपनी ही किर्लोस्कर जनरेटरचे अधिकृत विक्रेते व लिगाँग कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आदींची विक्री करत आहे. गोकुळ सर्व्हिसेसच्या बेळगाव, विजापूर, कलबुर्गी, विजयनगर (होसपेट) या ठिकाणी शाखा आहेत. याचा ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी फायदा होतो आहे. गोकुळ पॉवर सर्व्हिसेसकडून स्टोन क्रशर, खाणकाम आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी यंत्रे पुरविली जातात. गोकुळ पॉवर सर्व्हिसेसच्या अधिकृत डिलरकडून घेतलेली ही यंत्रे मजबूत, टिकावू आणि कार्यक्षम असतात.

Advertisement

यांच्या उत्पादनांना ग्राहकांची वाढती मागणी असल्याने गोकुळ पॉवर सर्व्हिसेसचे नाव उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. गोकुळ पॉवर सर्व्हिसेसने लिगाँग कंपनीचा पहिला इलेक्ट्रिक व्हील लोडर गणीकोप येथील साई स्टोन क्रशर यांना विक्री केला आहे. सदर इलेक्ट्रीक व्हील लोडर पूर्णपणे भारतात बनविण्यात आला आहे. हा इलेक्ट्रीक व्हील लोडर जीपीएस ट्रॅकिंगसह उपलब्ध आहे. याच्या बॅटरीवर 10,000 तास किंवा पाच वर्षांची वॉरंटी आहे. बॅटरीचे आयुष्य 30,000 तासांपेक्षा जास्त आहे. डिझेल व्हील लोडरच्या तुलनेत इलेक्ट्रीक व्हील लोडर वापरल्यास 8 तासांच्या शिफ्टमध्ये 7200 रुपयांची बचत होते. याचा फायदा इलेक्ट्रीक व्हील लोडर घेणाऱ्या मालकांना नक्कीच होतो आहे.

गोकुळ पॉवर सर्व्हिसेस कंपनीची स्थापना 2000 साली झाली आहे. सुरुवातीला गोकुळ पॉवर सर्व्हिसेसने जनरेटर विक्री करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. 2003 साली महिंद्रा अॅण्ड महिंद्रा जनरेटरची विक्री केली. नंतरच्या काळात 2007 मध्ये देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या किर्लोस्कर कंपनीची डिलरशीप घेतली. 2018 पासून कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विक्री सुरू केली. यामध्ये इस्कॉवेटर, व्हील लोडर, बॉकोलोडर आदी विक्री करण्यात येत आहेत. कंपनीत अनुभवी इंजिनिअर आहेत. कंपनीकडे सर्व स्पेअर पार्ट्स मिळतात. बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा इलेक्ट्रीक व्हील लोडर गोकुळ पॉवरने साई स्टोन क्रशरला विक्री केला. यावेळी सदर स्टोन क्रशर मालकांचा सत्कार करण्यात आला.

इंधन-पैशांची चांगली बचत...

इलेक्ट्रीक कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटच्या खरेदीसाठी सरकारकडून विविध प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत. खडीमशीन व खाण व्यवसाय करणाऱ्या मालकांना इलेक्ट्रीक व्हील लोडर फायदेशीर ठरणार आहे. हा इलेक्ट्रीक व्हील लोडर 4 टन क्षमतेचा 838 टीई व्हील लोडर 70 मिनिटात पूर्ण चार्ज होतो. सदरचा लोडर चार्जिंग केल्यास 6 ते 8 तास कार्य करतो. डिझेल व्हील लोडरला 8 तासांच्या शिफ्टसाठी 8800 रुपये इतका खर्च येतो. या तुलनेत इलेक्ट्रिक व्हील लोडरला 8 तासांसाठी केवळ 1600 रुपये इतका खर्च येतो. यावरून इंधन व पैशांची चांगली बचत होते. विविध खाण सेवांसाठी याचा उत्तम वापर करता येतो.

-जगन्नाथ कुलकर्णी, एमडी, गोकुळ पॉवर सर्व्हिसेस.

Advertisement
Tags :

.