बच्चे सावर्डेत ऊस तोड मजुरांना फराळ वाटप
वारणानगर प्रतिनिधी
बच्चे सावर्डे ता.पन्हाळा येथील श्रीमती भा.रा.यादव हायस्कूलच्या संकल्पनेतून एक हात मदतीचा, माणुसकीची भिंत या संकल्पनेतून बच्चे सावर्डेत आलेल्या ऊस तोडणी मजुरांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करीत त्याची दिवाळी गोड केली.
दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब आपआपल्या ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करत असते. पण गोरगरिबांना यापासून वंचित राहावे लागते. ऊस तोडणी मजुर हे तर आपले गाव, भाग आपले नातेवाईक यांना सोडून शेकडो मैल दूर आलेले असतात. त्यांना सुध्दा या दिवाळीचा आनंद साजरा करता यावा, या भावनेतून श्रीमती भा.रा. यादव हायस्कूलच्या संकल्पनेतून एक हात मदतीचा व माणुस्कीची भिंत हा उपक्रम हाती घेऊन बच्चे सावर्डे मध्ये ऊस तोडणी मजुरांना फराळ वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ही जिवना विषयी धडा शिकायला मिळाला.या उपक्रमात शाळेतील आजी व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, मुख्याध्यापक पी. आर पाटील, शिक्षक बी.आर बच्चे, आण्णा पाटील, श्री. हजारे, गुरव. यांच्यासह लेखणीक व कर्मचारी. यांचा सहभाग होता. मजुरांना फराळ वाटप प्रसंगी प्रशांत बच्चे, सुशांत बच्चे,प्रमोद बच्चे,शुभंम बच्चे, जयदीप मोरे,निवास आण्णा बच्चे,दिपक आण्णा बच्चे ग्रामसेवक अमर बांदल. सुनिल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.