For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वितरण

09:40 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वितरण
Advertisement

नवीन 200 अंगणवाडी इमारतींना मंजुरी : 200 कोटींचा निधी अपेक्षित

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्याने 200 इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबर इतर सुविधाही अंगणवाड्यांना पुरविल्या जाणार आहेत. अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. शुक्रवारी कुमार गंधर्व रंगमंदिरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अंगणवाडीचा कारभार सुरळीत आणि ऑनलाईन करण्यासाठी जिल्ह्यातील 5,656 अंगणवाड्यांमधील सेविकांना स्मार्ट मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले आहे. त्याबरोबर सेविकांसाठी साड्या आणि प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देणार

Advertisement

बेळगाव जिल्ह्यात नव्याने 200 अंगणवाडी इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी 160 इमारतींना मंजुरी मिळाली आहे. शिवाय यासाठी 200 कोटींचा निधी अपेक्षित आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 2 कोटीचा निधीही मंजूर झाल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. याबरोबर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देण्यासाठीही सरकारतर्फे प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट केले. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन देण्यात आले होते. मात्र, ते कूचकामी ठरल्याने कामात अडथळे निर्माण होत होते. दरम्यान अंगणवाडी सेविकांनी नवीन स्मार्टफोन देण्यात यावेत, अशी मागणी केली होती. याची दखल घेत सरकारकडून अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वितरीत करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.