For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्ती योजनेतील ‘स्मार्ट कार्ड’ वितरण रखडले

10:55 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
शक्ती योजनेतील ‘स्मार्ट कार्ड’ वितरण रखडले
Advertisement

आधार कार्ड दाखवूनच महिलांचा प्रवास : वाढीव मुदत संपली

Advertisement

बेळगाव : शक्ती योजनेंतर्गत प्रवास करणाऱ्या महिलांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया रखडली आहे. गेल्या जूनपासून शक्ती योजनेला प्रारंभ झाला. दरम्यान, स्मार्ट कार्डसाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. मात्र,  वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप स्मार्ट कार्ड मिळाली नाहीत. त्यामुळे महिलांचा प्रवास आधार कार्डवरच सुरू आहे. काँग्रेस सरकारने 5 गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये शक्ती  योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. प्रवासादरम्यान वाहकाला दाखविण्यासाठी स्मार्ट कार्ड देण्यात येणार होते. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही.  त्यामुळे स्मार्ट कार्ड कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शक्ती योजनेंतगत प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे विविध मार्गांवर बसफेऱ्या कमी पडू लागल्या आहेत. प्रवाशांच्या संख्येत बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थीवर्गाला  नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महिला प्रवाशांना स्मार्ट कार्डचे वितरण झाल्यास एकूण महिला प्रवाशांची संख्या समजण्यास मदत होणार आहे.

आदेश येताच कार्यवाही

एकूण खर्चाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी महसूल खात्याला स्मार्ट कार्ड गरजेचे आहे. निवडणूक इतर कामामुळे स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आली नाहीत. शासनाकडून आदेश आल्यानंतर महिला मोफत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड वितरित केले जाणार आहेत.

- अनंत शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)

Advertisement
Advertisement
Tags :

.