मातोंड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
उद्योजक रोशन परब यांचा स्तुत्य उपक्रम
मातोंड:
कै. राजश्री रमाकांत परब यांच्या तृतीय स्मृतीदिनाचे औचित्य साधून, युवा उद्योजक श्री. रोशन रमाकांत परब यांच्या वतीने मातोंड हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या शालेय वस्तूंचे नुकतेच वाटप करण्यात आले. बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या वतीने शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष श्री. अनिल परब यांनी श्री. रोशन परब यांचे स्वागत केले. आपल्या मनोगतात रोशन परब यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही शालेय प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, शाळेच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शाळेसाठी ६ नवीन फॅन देण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही यावेळी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. चांदणे सर यांनी केले. या कार्यक्रमाला रोशन परब, जान्हवी परब, रुही परब, अनन्या परब, दुर्वी परब, उपसरपंच आनंद परब, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष अनिल परब, तरुण भारतचे पत्रकार रविकिरण परब, नंदकिशोर परब, प्रशांत उर्फ बाजा परब, राजन चव्हाण, तसेच शाळेचे शिक्षक चांदणे सर, पाटील मॅडम, आडके मॅडम, सावळ मॅडम, दीपक पाटील सर, रूपक मातोंडकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.