महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अधिकारी-पोलिसांना रेनकोटचे वितरण

11:21 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वॉकीटॉकी ठेवण्यासाठी खिसा, रिफ्लेक्टरची रेनकोटमध्ये सोय

Advertisement

बेळगाव : पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पोलिसांना रेनकोट वितरित करण्यात आले.बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शहरातील अधिकारी व पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पोलिसांना रेनकोट वाटप केले. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह शहरातील बहुतेक अधिकारी उपस्थित होते. बुधवारी सांकेतिकपणे रेनकोट वाटपाला चालना देण्यात आली असून प्रत्येक पोलीस स्थानकात वाटप करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक व नागरी पोलीस दलातील 900 पोलिसांसाठी रेनकोटची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. पोलिसांना ऊन, पाऊस व वारा सोसत कर्तव्य बजावावे लागते. पावसापासून त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी पोलीस दलाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून या रेनकोटवर रिफ्लेक्टरही आहे. वॉकीटॉकी ठेवण्यासाठी पारदर्शक खिसाही बनविण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article