गणेश चतुर्थी निमित्त संदेश निकम मित्रमंडळाकडून पूजा साहित्य वाटप
वेंगुर्ले (वार्ताहर)-
दिनांक २७ ऑगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त शहरातील गणेशभक्त व त्यांच्या कुटुंबियांना संदेश निकम मित्रमंडळाच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वितरण करून गणेश पुजन साहित्यासह शिधा वितरण शुभारंभ दाभोली नाका येथील कार्यालयात संदेश निकम यांच्यामार्फत आज करण्यात आला. या मंडळाचे संस्थापक माजी नगराध्यक्ष संदेश निकम व माजी नगरसेविका सौ. सुमन निकम यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चतुर्थीत गणेशाचे पुजनाचे लागणारे साहित्य घरोघरी पोहोचवत आहेत . संदेश निकम मित्र मंडळ,गेली १२ वर्षे आरोग्य सेवेअंतर्गत अखंड रूग्णवाहिकेची सेवा कोरोना कालावधीत शहरांत तसेच बाहेरील व्यक्तींना सर्व प्रकारचे मदत कार्य , शालेय मुलांच्या शिक्षण प्रवेश, शैक्षणिकदृष्ट्या विविध स्वरूपाची मदत कार्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभांसाठी महिला व पुरूषांना मदत कार्य गोरगरीबांना सण कालावधीत तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य करीत आहे. यावेळी दाजी नांदोसकर, वैभव फटजी, दाभोली उपसरपंच पपल बांदेकर, युवासेनेचे सिध्देश कोले, अविनाश सडवेलकर, रँक्स परेरा, पप्पा गावडे, विकी फर्नांडिस, पिंटू धावडे, श्री. पवार, श्री. मयेकर यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.