वेंगुर्ले इनरव्हील क्लबतर्फे जिव्हाळा सेवाश्रमातील निराधारांना साहित्य वाटप
इनरव्हील क्लब वेंगुर्लेचे सेवाभावी काम
वेंगुर्ले (वार्ताहर)-
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या पदाधिकारी यांनी शनिवारी कुडाळ माडयाचीवाडी येथील वृध्द-निराधारांसाठी असलेल्या जिव्हाळा सेवाश्रम येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी जिव्हाळा सेवाश्रमाचे संचालक सुरेश बिर्जे यांच्याकडे वृध्दांना दररोज लागणारे विविध साहित्य प्रदान केले.कुडाळ माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमांस इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या पदाधिकारी अध्यक्ष अध्यक्ष मंजुषा आरोलकर, डॉ. पूजा कर्पे, गौरी मराठे, श्रिया परब, दिपाली बाडेकर, रसिका मठकर, सई चव्हाण, बंदना शितोळे यांनी भेट देत आश्रमाचे संचालक सुरेश बिर्जे यांच्याशी सेवाश्रमातील वृध्दांशी चर्चा केली.तसेच या आश्रमाचा लाभ घेत असलेले निराधार वृध्द व अपंग यांच्याशी संवाद साधला. या सर्व वृध्दांना दरदिवशी अत्यावश्यक असलेले मेडिकल कीट, डायपर, जेवणाचे साहित्य, हायजिन कीट, कपडे, बिस्कीट, व इतर उपयोगी साहित्य भेट दिले.जिव्हाळा सेवाआश्रमाचे संचालक सुरेश बिर्जे यांनी इनरव्हील क्लब वेंगुर्लेच्या पदाधिकाऱ्यांचे वृध्दाश्रमातर्फे आभार व्यक्त केले. इनरव्हील क्लब वेंगुर्लेने सर्वसामान्य आणि गरजवंत अशा व्यक्तींसाठी सेवाभावी काम सुरू ठेवलेले अशा हा सुध्दा कार्यक्रम सेवाभावी असल्याचे इनरव्हील क्लबतर्फे स्पष्ट करण्यात आले.