देसूर श्री ब्रम्हलिंग देवस्थानात महाप्रसादाचे वाटप
10:53 AM Sep 03, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर /धामणे
Advertisement
देसूर तालुका बेळगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवार दि. 2 रोजी येथील आराध्य दैवत श्री ब्रम्हलिंग देवस्थानात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचे आयोजन श्री ब्र्रम्हलिंग गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. सोमवारी सकाळी देवाला अभिषेक घालून देवाचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. दुपारी दोन ते पाच या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देसूर आवारातील आणि पंचक्रोषीतील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते व ग्राम पंचायत सदस्य सतीश चव्हाण यांनी बरेच परिश्रम घेतले.
Advertisement
Advertisement
Next Article