बांधकाम कामगारांच्या किटचे आमदार सेठ यांच्या हस्ते वितरण
10:39 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्याकडून बांधकाम कामगारांना किटचे वाटप करण्यात आले. इलेक्ट्रिशियन, प्लंबर व इतर बांधकाम कामगारांना हे साहित्य देण्यात आले. वैभवनगर येथील कार्यालयात किट देण्यात आले. बांधकाम कामगारांना काम करताना मदत व्हावी यासाठी सरकारकडून साहित्य पुरविले जाते. यामध्ये विविध मशिनरी तसेच इतर साहित्याचा समावेश असतो. शेकडो कामगारांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी बांधकाम कामगार तसेच कामगार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement