For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडखोल पावणाई दुग्ध संस्थेच्यावतीने शेतकऱ्यांना भेटवस्तूचे वितरण

11:44 AM Oct 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
माडखोल पावणाई दुग्ध संस्थेच्यावतीने शेतकऱ्यांना भेटवस्तूचे वितरण
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
माडखोल येथील श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने दिवाळी निमित्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दर फरकाच्या रकमेसह भेटवस्तूचे वितरण संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राजन राऊळ, उद्योजक रवींद्र राऊळ, माडखोल सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश नाईक, संस्थेचे चेअरमन ॲड सुरेश आडेलकर, व्हॉईस चेअरमन संदीप येडगे, संस्थेचे संचालक अशोक सावंत, गजानन धुरी, पांडुरंग राऊळज्ञानदेव राऊळ,रामचंद्र सावंत तसेच जानू तेली, प्रताप गावडे,शरद गावडे,सुर्यकांत नाईक, संदेश धुरी, संतोष लातये, नामदेव परब, महादेव धुरी, शिवराम राऊळ, अरुण म्हालटकर, उमेश आडेलकर,,अमित म्हालटकर,नाना मेस्त्री,प्रकाश राऊळ, लखन आडेलकर, हरिश्चंद्र सावंत आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात प्रथम तीन क्रमांकाचे दुग्ध उत्पादन करणारे शेतकरी संपत शंकर नाईक, विलासिनी विलास पोकळे, लवू धोंडू येडगे यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ रुपयांचे पारितोषिक व शाल आणि श्रफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच संस्थेसाठी गेली ८ वर्षे आपल्या घरातील जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल घर मालक चंद्रकांत माडखोलकर, संगीत क्षेत्रात अल्पावधीत नावारुपाला आलेला नवोदित भजनी बुवा सुदेश गावडे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ॲड सुरेश आडेलकर यांनी संस्थेच्या पारदर्शक व्यवहारासह मेहनती शेतकऱ्यांमुळेच संस्था निश्चित ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगुन गोकुळ आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे दूध डेअरी व शेतकरी यांचे विश्वासाचे नाते निर्माण झाल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे संस्थेच्या जडणघडणीमध्ये कोल्हापूर दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) तसेच दुध संस्थेसाठी गेली ८ वर्षे मोक्याची जागा ऊपलब्ध करून देणारे शेतकरी श्री चंदकांत माडखोलकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीत दरवर्षी भेटवस्तू देण्याचा संस्थेचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगुन डेअरीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.