कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंबोली जि. प मतदारसंघातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

02:45 PM Jul 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

युवा नेते दिनेश गावडे यांचा उपक्रम

Advertisement

ओटवणे|प्रतिनिधी
नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व ही तिन्ही मूल्ये जोपासणाराच खरा समाजाभिमुख नेता ठरतो. आंबोली–चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेतृत्व दिनेश गावडे हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. दिनेश गावडे गेली दहा वर्षे आंबोली–चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावातील शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, कला, क्रिडा व सांस्कृतिक उपक्रमात महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांचे हे कार्य आंबोली–चौकुळ परिसरासाठी अभिमानास्पद असून आदर्शवत आहे. असे प्रतिपादन सकल हिंदू समाज व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले. युवा नेते दिनेश गावडे यांच्या वतीने आंबोली–चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील प्राथमिक व माध्यमिक शाळामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी सिताराम गावडे बोलत होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चौकुळ, आंबोली, गेळे, केसरी, फणसवडे, देवसू, पारपोली, दाणोली, सातुळी, बावळाट, विलवडे, भालावल, कोनशी दाभिल आदी गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्लास्टिक मुक्तीसह पर्यावरण संतुलन उपक्रम प्लास्टिक बॉटलमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला होणारा धोका ओळखून तसेच गरम व थंड पाणी ठेवण्यास उपयुक्त अशा स्टील थर्मस बॉटलचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. दिनेश गावडे यांच्या या उपक्रमातून "प्लास्टिक मुक्त अभियान" राबवले गेले असुन पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यास मदत झाली. यावेळी दिनेश गावडे यांनी मुलांशी संवाद साधताना आपल्या शालेय जीवनातील गमतीजमती मांडल्या. त्यांच्या या आठवणींमुळे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून वातावरण हलके फुलके झाले. यावेळी भरत गावडे यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनण्याचे महत्त्व सांगून "वाचन, चिंतन आणि गुरुजनांचे ऐकण्याचे आवाहन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षकांनी दिनेश गावडे यांचा हा उपक्रम हा केवळ एक सामाजिक बांधिलकी नसून भावी पिढीच्या जडणघडणीत मोलाचा संदेश देणारा ठरणार असल्याचे सांगितले. दिनेश गावडे यांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे. यावेळी दिनेश गावडे यांचे मित्रमंडळ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article