For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बावळाट आणि सातुळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

03:15 PM Feb 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
बावळाट आणि सातुळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
Advertisement

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील एस. जी फाउंडेशनचा उपक्रम

ओटवणे प्रतिनिधी

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील एस जी फाउंडेशनच्यावतीने बावळाट आणि सातुळी येथील प्राथमिक शाळेतील १०० हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एस जी फाउंडेशनचे आभार मानले.यावेळी एस जी फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर गावकर, फाउंडेशनचे संस्थापक संदेश गावकर, सातुळी बावळाट सरपंच सोनाली परब, माजी सरपंच उत्तम परब, पोलीस पाटील आबा परब, सुरेश कदम, भास्कर परब, गजानन गावकर, बावळाट प्राथमिक शाळेचे शिक्षक रामा गोरे, श्री धुरी, सौ. देसाई आदी उपस्थित होते. एस जी फाउंडेशनच्यावतीने मुंबईत गेली ११ वर्षे रक्तदान शिबिरे हृदयरोग व नेत्र तपासणी आदी आरोग्य उपक्रमांसह शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच सातुळी आणि बावळाट गावातही शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात.यावेळी शंकर गावकर यांनी एस जी फाउंडेशनच्यावतीने यापुढेही बावळाटसह सातुळी गावाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.