पांग्रड शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
ॲड. यशवर्धन राणे यांचे सौजन्य ; लोकमान्य टिळक जयंतीचे औचित्य
कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील जिल्हा परिषद शाळा नं. 1 (कुंभयाचीवाडी) येथे आज लोकमान्य गंगाधर टिळक जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड. यशवर्धन राणे यांच्या सौजन्याने व आदरणीय मा. पावसकर आणि करलकर यांच्या सहकार्याने करण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील उपशिक्षक महेश कुंभार यांनी ॲड. यशवर्धन राणे व शिवसेना पदाधिकारी यांच्या बद्दल माहिती शेअर केली व त्यांचे आभार मानले. राणे यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात व कुडाळ तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत.या कार्यक्रमात मा. विभाग प्रमुख प्रविण मर्गज, पांग्रड शाखा प्रमुख रामदास मेस्त्री, पांग्रड बूथ प्रमुख मा. गुणाजी घोगळे, सुभाष मर्गज आणि पांग्रड गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय शिक्षक अजबे गुरूजी, शिक्षिका पाटील मॅडम, अंगणवाडी सेविका चव्हाण मॅडम, अंगणवाडी मदतनीस घोगळे मॅडम आणि माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या पत्नी घाडी मॅडम यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.