मळगाव हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अँपचे वितरण
सावंतवाडीच्या इनरव्हील क्लबचा शैक्षणिक उपक्रम
ओटवणे \ प्रतिनिधी
सावंतवाडी इनरव्हील क्लबच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अँप चे वितरण करण्यात आले. या अँपचे वितरण इनरव्हील अध्यक्ष मृणालिनी कशाळीकर यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या अँपमध्ये इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम ॲनिमेटेड स्वरूपात सोप्या पद्धतीने शिकवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत शिकविलेला अभ्यासक्रम या ॲपमुळे पुन्हा घराकडे समजावून घेणे सोपे होणार आहे. या उपक्रमासाठी सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष अँड सिद्धांत भांबुरे, सेक्रेटरी सिताराम तेली यांचे सहकार्य लाभले.मळगाव इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अँप चे वितरण केल्याबद्दल प्रशालेने सावंतवाडी इनरव्हील क्लबचे आभार मानले. यावेळी श्रेया नाईक, स्त्रीरोगतज्ञ डॉ नेत्रा सावंत, डॉ शुभदा करमरकर, दर्शना रासम आदी उपस्थित होत्या.