ख्रिसमस निमित्त गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ड्रेस व बूटचे वितरण
निवृत्त वन अधिकारी फ्रान्सिस रॉड्रिक्स यांचा उपक्रम
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी येथील वन खात्याचे निवृत्त अधिकारी फ्रान्सिस रुजाय रॉड्रिक्स यांनी ख्रिसमस निमित्त सावंतवाडीतील मिलाग्रीस बोर्डिंग आणि फातिमा बोर्डिंग मधील प्रत्येकी १५ अशा एकूण ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ड्रेसचे वितरण केले. त्यांच्या या उपक्रमाचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे. सावंतवाडीतील मिलाग्रीस बोर्डिंग आणि फातिमा बोर्डिंगमध्ये गरीब व होतकरू मुले शिक्षण घेतात. ख्रिसमस मध्ये या गरीब मुलांचा आनंद द्विगुणीत व्हावा या उद्देशाने फ्रान्सिस रॉड्रिक्स यांनी या विद्यार्थ्यांना ड्रेसचे वितरण केले. याबद्दल या विद्यार्थ्यांनी फ्रान्सिस रॉड्रिक्स यांचे आभार मानले. सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या फ्रान्सिस रॉड्रिक्स यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. त्यानी लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी मध्ये १५ वर्षे सदस्य म्हणून काम करताना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. यापूर्वीही २००५ मध्ये त्यांनी इंटरनॅशनल लायन्स क्लब यांच्याकडून २०० गोरगरिबांना ब्लॅंकेट्सचे वितरण केले होते.