For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जि. प. इन्सुली प्रशालेत अधिवास दाखल्यांचे वितरण

04:47 PM Sep 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
जि  प  इन्सुली प्रशालेत अधिवास दाखल्यांचे वितरण
Advertisement

तहसीलदार श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी व सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इन्सुली नं. ४ येथील विद्यार्थ्यांना अधिवास दाखले तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यात सुलभता मिळाली असून पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शाळेतील उपक्रम व विद्यार्थ्यांच्या कौशल्य पाहुन शाळेचे कौतुक केले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, इन्सुली तलाठी भक्ती सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक रुपेश परब, कृषी सहाय्यक सीमा घाडीगावकर, शिक्षक पालक संघांचे प्रांजल कांदे, चेतना पालव, शिक्षक भक्ती मुळीक, प्रतिभा खुरसुले, प्रिया करमळकर यांच्या उपस्थितीत दाखले वाटप झाले. विद्यार्थ्यांना दाखल्यांचे महत्त्व पटवून दिले.कमी कालावधीत दाखले उपलब्ध करून दिल्याबद्दल सीएसइ सेंटर प्रमुख तूळसकर यांचे विशेष आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे शासनाचे ''प्रशासन जनतेच्या दारी" पोहोचविण्याचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना अधिवास दाखले मिळाल्याने शैक्षणिक प्रक्रियेत मोठी सोय झाली असून पालकांचा भार हलका झाला आहे. यावेळी तलाठी भक्ती सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.