महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जन्म-मृत्यू दाखल्याचे वितरण सुरू

10:25 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्व्हरडाऊनमुळे समस्या : काम सुरळीत करण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर महानगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू दाखल्याचे वितरण गुरुवारपासून सुरू झाले. मात्र सर्व्हरडाऊनचा फटका साऱ्यांनाच सहन करावा लागत आहे. सहा दिवसांपासून बंद असलेल्या या कामाला सुरुवात झाली खरी मात्र अधिक गर्दी असल्यामुळे त्याचा कर्मचाऱ्यांवरही ताण पडताना दिसत होता. यातच वारंवार सर्व्हरडाऊन होत असल्यामुळे साऱ्यांनाच ताटकळत थांबावे लागत होते. जन्म व मृत्यू दाखला सध्या महत्त्वाचा आहे. या दाखल्यानंतरच विविध सरकारी कामकाज चालते. शाळेतील प्रवेशासह इतर कामांसाठी जन्म दाखल्याची नितांत गरज आहे. याचबरोबर वारसा असो किंवा इतर मालमत्ता खरेदी-विक्री, तसेच कुटुंबीयांच्या नावावर करताना मृत्यू दाखल्याची गरज असते. त्याशिवाय ही कोणतीच कामे मार्गी लागणे अशक्य आहे. परिणामी दाखले मिळविण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये गेल्या दीड महिन्यापासून मनपातील कर्मचाऱ्यांना गुंतविण्यात आले होते. त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम झाला. मनुष्यबळ कमी असल्याने सर्वच कामे प्रलंबित राहिली आहेत. आता मतदान झाले आहे. त्यामुळे एक दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी हे सर्व कर्मचारी पुन्हा हजर झाले आहेत. सकाळपासूनच जन्म आणि मृत्यू दाखल्याच्या वितरणाचे काम सुरू झाले. मात्र सर्व्हरडाऊन होत असल्यामुळे समस्या निर्माण झाली.

Advertisement

सोमवारपासून नियमित काम सुरू

निवडणुकीच्या कामामध्ये कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. मंगळवारी लोकसभेचे मतदान झाले. त्यानंतर बुधवारी एक दिवस साऱ्यांनीच विश्रांती घेतली. गुरुवारी आम्ही कामावर रुजू झालो. त्यानंतर तातडीने जन्म आणि मृत्यू दाखल्याचा विभाग सुरू केला. मात्र सर्व्हरडाऊन होत असल्यामुळे समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. आता सलग तीन दिवस सुटी आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर हे वितरणाचे काम सुरू ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारपासून नियमित कामाला सुरुवात केली जाणार आहे.

-डॉ. संजीव नांद्रे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article