For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्हावेलीत टॉवर असूनही बीएसएनएलचे नेटवर्क गूल

04:04 PM Nov 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
न्हावेलीत टॉवर असूनही बीएसएनएलचे  नेटवर्क गूल
Advertisement

त्रस्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Advertisement

न्हावेली /वार्ताहर

न्हावेली गावात गेल्या काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलची सेवा अत्यंत विस्कळीत झाली असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावात बीएसएनएलचा टॉवर असूनही नेटवर्क कधीही येते.आणि कधीही जाते.या अनिश्चिततेमुळे विशेषत : नोकरदारवर्ग आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत असून ही सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि मोबाईल सेवा ही मूलभूत गरज बनली आहे.गावात अनेक नोकरदार व्यक्तींना वर्क फ्रॉम करावे लागते. विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण आणि गृहपाठांसाठी इंटरनेटची आवश्यकता असते.परंतु न्हावेलीमध्ये बीएसएनएलच्या अनियमित सेवेमुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे .महत्वाचे फोन कॉल्स लागत नाहीत.इंटरनेट संथ गतीने चालते किंवा पूर्णपणे बंद होते.यामुळे अनेक महत्वाची कामे खोळंबत आहेत.गावात टॉवर असूनही सेवेची ही अवस्था चिंताजनक आहे.वारंवार तक्रार करुनही परिस्थितीत सुधारणा नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.बीएसएनएल प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन न्हावेली गावातील सेवा पूर्ववत आणि सुरळीत करावी.जेणेकरून दैनंदिन व्यवहार सुरळीत चालतील.नोकरदार व विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबेल अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा न्हावेली ग्रामस्थांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.