महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जि. पं.-ता. पं. निवडणुकांसाठी लवकरच आरक्षण

06:01 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मतदारसंघ पुनर्रचनेनुसार होणार आरक्षण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे राजकीय पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सदर निवडणुका डिसेंबर दरम्यान घेण्याची शक्यता निवडणूक विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी लवकरच आरक्षण जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जि. पं. व ता. पं. सभागृह विसर्जित होऊन जवळपास अडीच वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून सरकारला या निवडणुका घेण्यासंदर्भात अनेकवेळा सूचना करण्यात आल्या आहेत. तर जि. पं. व ता. पं. मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रलंबित असणारा प्रश्न यापूर्वीच मार्गी लावण्यात आला आहे. मतदारसंघ निश्चित करण्यासंदर्भात आक्षेप मागविण्यात आले होते. ऑनलाईनवर आक्षेप दाखल करण्यात आले होते. सदर आक्षेप निकालात काढण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण झाली असून आता आरक्षण प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या आरक्षणाचा विचार करून व नव्या पुनर्रचित मतदारसंघाच्या अनुषंगाने नवीन आरक्षण प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठीही निवडणूक विभागाकडून अहवाल देण्यात आला आहे.

दरम्यान, नवीन मतदारसंघानुसार आरक्षण जाहीर करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरच आरक्षण प्रक्रिया निश्चित करून आरक्षण जाहीर केले जाणार आहे. पुढील प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर ही प्रक्रिया केली जात आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर येणाऱ्या आक्षेपांवर निकाल लावणे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे आदी बाबींची पूर्तता करावी लागते. यामध्ये बराच वेळ जातो. सरकार डिसेंबरच्या दरम्यान या निवडणूक घेण्यासाठी हालचाली करीत आहे. त्यामुळे आरक्षण लवकर जाहीर केली जाण्याची शक्यता आहे, असे निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नुकताच एका कार्यक्रमा दरम्यान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या निवडणुका येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे आक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article