For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीलंका राष्ट्रपतीपदी दिसानायके शपथबद्ध

06:10 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीलंका राष्ट्रपतीपदी दिसानायके शपथबद्ध
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

अनुरा कुमारा दिसानायके यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रपती सचिवालयात सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांच्या उपस्थितीत श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनुरा दिसानायके यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. देशात पुनर्जागरणाच्या नव्या युगाची सुऊवात करण्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शक्मय ते सर्व प्रयत्न करू, असे त्यांनी शपथविधीनंतर स्पष्ट केले.

श्रीलंकेत शनिवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले. रविवारी निकाल जाहीर करण्यात आला असून जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) पक्षाचे नेते आणि नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे उमेदवार 55 वषीय दिसानायके यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मार्क्सवादी नेते दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समगी जना बालावेगयाचे (एसजेबी) त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सजिथ प्रेमदासा यांचा पराभव केला आहे.

Advertisement

मोठा राजकीय अनुभव

श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती दिसानायके यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. 80 च्या दशकात त्यांनी विद्यार्थी राजकारणापासून सार्वजनिक जीवनाला सुऊवात केली. दिसानायके 2000 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले आणि 2004 मध्ये ते मंत्री झाले. ते 2014 पासून ‘जेव्हीपी’चे अध्यक्ष असून 2019 मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती.

श्रीलंकेचा भूभाग कोणाच्याही विरोधात वापरणार नाही!

दिसानायके हे चीनचे समर्थक असल्याचे मानले जातात. तथापि, त्यांच्या पक्षाने आता विजयानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिसानायके यांच्या पक्षाचे प्रवक्ते विमल रत्नायके यांनी जारी केलेल्या निवेदनात श्रीलंकेचा भूभाग इतर कोणत्याही देशाविऊद्ध वापरला जाणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. हिंद महासागरातील श्रीलंकेच्या सामरिक स्थानामुळे त्याची भौगोलिक राजकीय प्रासंगिकता वाढली आहे. भारताशी संबंधित प्रश्नावर एनपीपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्राध्यापक अनिल जयंती यांनी भारत निश्चितच आपला महत्त्वाचा शेजारी व एक महासत्ता असून त्याचे स्वत:चे महत्त्व असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.