For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराच्या पाणीपुरवठ्यात आज व्यत्यय : जलवाहिनीला गळती

12:53 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहराच्या पाणीपुरवठ्यात आज व्यत्यय   जलवाहिनीला गळती
Advertisement

 राणी चन्नम्मा चौकात दुरुस्तीचे काम हाती

Advertisement

बेळगाव : वीरराणी चन्नम्मा चौकात जलवाहिनीला गळती लागली असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाच्या पाणीपुरवठ्यात बुधवार दि. 3 रोजी व्यत्यय येईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन एलअॅण्डटी कंपनीला  सहकार्य करावे, असे कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे. बागवान गल्ली, खडेबाजार, दरबार गल्ली, भोई गल्ली, पांगुळ गल्ली, मोमीन गल्ली, बुरूड गल्ली, गणपत गल्ली, रविवार पेठ, कलईगार गल्ली, कामत गल्ली, कसाई गल्ली, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोनवाळ गल्ली, शेरी गल्ली, मठ गल्ली, मुजावर गल्ली, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, महाद्वार रोड पहिला ते पाचवा क्रॉसपर्यंत, संभाजी गल्ली, आठल्ये चाळ, एसपीएम रोडचा दुसरा क्रॉस, गुड्सशेड रोडचा चौथा क्रॉस, वीरभद्रनगर पहिला ते सातवा क्रॉस, फाऊकिया कॉलनी, अहमदनगर व पोलीस हेडक्वॉर्टर्समध्ये पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.