For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : मल्लेवाडीत ऊस वाहतुकीवरून वाद, शेतकऱ्यावर प्लॅस्टिक पाईपने मारहाण

04:02 PM Jan 30, 2026 IST | NEETA POTDAR
sangli   मल्लेवाडीत ऊस वाहतुकीवरून वाद  शेतकऱ्यावर प्लॅस्टिक पाईपने मारहाण
Advertisement

                               ऊस वाहतूकदाराला मल्लेवाडी येथे मारहाण

Advertisement

मिरज : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर माझ्या घरासमोरुन न्यायचा नाही, असे म्हणून तालुक्यातील मल्लेवाडी येथे ऊस वाहतूकदाराला प्लॅस्टीकच्या पाईपने मारहाण करण्यात आली. याबाबत आण्णासोो जंबू देसाई (वय ७०) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयीत सन्मतीकुमार सुरेंद्र देसाई (वय ४५) यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आण्णासो देसाई यांचा शेती व्यवसाय आहे. ते शेतातील ऊस वाहतूक करत होते. यावेळी त्यांचा चुलत पुतण्या संशयीत सन्मतीकुमार देसाई यांनी आण्णासो देसाई यांना, तुमच्या ऊसताडीचे ट्रॅक्टर माझ्या घराजवळून न्यायचे नाही, असे म्हणून धमकी देऊन प्लॅस्टीकच्या पाईपने मारहाण केली. या मारहाणीत आण्णासोो देसाई हे जखमी झाले आहेत. त्यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.