For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | "मुलींना जेवायला का पाठवलं?" एका साध्या प्रश्नाचं रक्तरंजित उत्तर; बुधगावमधील त्या रात्रीचा थरार!

12:17 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime    मुलींना जेवायला का पाठवलं   एका साध्या प्रश्नाचं रक्तरंजित उत्तर  बुधगावमधील त्या रात्रीचा थरार
Advertisement

       सांगलीत किरकोळ कारणावरून महिलेसह वडिलांना बेदम मारहाण

Advertisement

सांगली : किरकोळ कारणावरून संताप अनावरझाल्याची धक्कादायक घटना बुधगाव येथे उघडकीस आली आहे. नातेवाईकांच्या कार्यक्रमात मुलींना जेवणासाठी का पाठविले, यावरून झालेल्या वादातून एका महिलेला तसेच तिच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी समिना अमिर मुल्ला (वय ३५, रा. नम्रता कॉलनी, बुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

संशयित अमिर आदम मुल्ला (वय ३५) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रविवारी दुपारी नातेवाईकांच्या कार्यक्रमात मुलींना जेवणासाठी पाठविल्यावरून दोघांमध्ये बाद झाला. संतापलेल्या अमिरने समिना यांना मारहाण केली. यानंतरही बाद थांबला नाही. त्याच दिवशी सायंकाळी ७.३० च्या सुमारास "घरातील जेवण का टाकून दिलेस?" यावरून पुन्हा खडसावत समिनाला धमकी देण्यात आली. दरम्यान, बाद सोडवण्यासाठी आलेल्या समिना यांच्या बडिलांनाही संशयिताने मारहाण केली.

Advertisement

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Tags :

.