उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पर्येत वाद
गांवकर महाजन गटाचा आरोप, न्यायालयात आव्हान देणार
वाळपई : गेल्या चार दिवसांपासून पर्ये येथील भूमिका देवस्थानात निर्माण झालेल्या घोळाला सर्वस्वी सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच वाद चिघळलेला आहे. पूर्वीचा आदेश रद्द करून त्यांनी नव्याने आदेश जारी केला. त्यामुळे गावकर महाजनांच्या अधिकारावर गदा आली आहे. या आदेशाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात येणार आहे. असे गावकर मंडळीने म्हटले आहे. वाळपई येथे उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या गावकर मंडळीच्या भाविकांना त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय घोळाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की साखळेश्वर देवस्थानामध्ये आयोजित केलेल्या वर्धापनदिनामध्ये काही गट इतरांना वगळून विधी करणार होते. या संदर्भाचे निवेदन 11 डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये याबाबतची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांना सविस्तरपणे दिली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी सदर विधी सर्व महाजनांना विश्वासात घेऊन करावो, असा आदेश दिला होता. मात्र या आदेशाला झुगारून माजीक गटाच्या अवघ्याच मंडळीकडून सदर विधी करण्यात आला. यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलिस यंत्रणा कमी पडली. उपजिल्हाधिकारांनी जारी केलेल्या आदेशाची प्रत 20 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता सार्वजनिक करण्यात आली. यामुळे यामागे काहीतरी षडयंत्र असण्याचा संशय गावकर मंडळींनी व्यक्त केला आहे.
उपजिल्हाधिकाऱ्याने दिलेला आदेश मागे घेऊन नव्याने आदेश जारी केला. यामुळे गावकर मंडळींच्या अधिकारावर गदा आलेली आहे. गावकर मंडळीच्या देवस्थानच्या अस्तित्वावर प्रŽचिन्ह निर्माण झालेले आहे. 21 डिसेंबर रोजी देवस्थानच्या वार्षिक पारंपरिक सप्ताहात गावकर मंडळांना सहभागी करून घेण्यात आले नाही. यामुळे गावकर मंडळीचा अपमान झालेला आहे असे यावेळी गावकर मंडळींनी स्पष्ट केले. उपजिल्हाधिकारांनी दिलेला आदेश व त्यामध्ये करण्यात आलेला बदल यामुळेच देवस्थानच्या परिसरामध्ये वाद चिघळला. यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारे अधिकारी आपल्याला पाहिजे तेव्हा आदेश बदलू शकतात का? असा प्रŽ गावकर मंडळींनी केलेला आहे. तसेच देवस्थानांचा धार्मिक विधी पहाटे 5 वाजता करण्यासाठी परवानगी देणे ही धार्मिक विधीच्या बाबतीत घडलेली विचित्र परिस्थिती आहे. यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या दुसऱ्या आदेशाच्या विरोधात न्यायालयामध्ये आव्हान देण्यात येणार आहे. देवस्थानामध्ये असलेला अधिकार गावकर मंडळींना मिळालाच पाहिजे असा पुनऊच्चार यावेळी त्यांनी केला
धार्मिक सोपस्कार कायदेशीरपणे होतील : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन, गावकर समाजाने घेतली भेट
श्री भूमिका देवी मंदिराच्या राखणदार साखळेश्वरच्या पूजेवरून सुऊ झालेल्या वादात उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याने त्याला आक्षेप घेत रविवारी गावकर समाजाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे धाव घेतली. गावकर समाजाने आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व काही कायदेशीर पद्धतीनेच होईल, असे आश्वासन दिले असल्याचे गावकर समाजाने सांगितले. शनिवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात उत्सव शांततेत पार पडला. सध्या पर्ये देवस्थानच्या सभोवताली कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्यानुसार एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 24 डिसेंबरपर्यंत देवस्थान बंद करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला गावकर समाज वगळता इतरांनी जोरदार विरोध केला होता.
दरम्यान गावकर समाजाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री निश्चितच गावकर समाजाला न्याय देतील आणि देवस्थानच्या धार्मिक प्रक्रिया यावर कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही यासंदर्भात लक्ष देतील, असा विश्वास गावकर समाजाच्या मंडळींनी व्यक्त केलेला आहे. सध्या पर्ये भागातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. कोणताही गोंधळ झालेला नाही. पारंपरिक सप्ताह साजरा करण्यात आला. दरम्यान, पर्येतील श्री भूमिका साखळेश्वर देवस्थानाचा पारंपरिक गवळण सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला.