For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेतोडा ग्रामविकास समितीच्या विलंबित बैठकीबद्दल नाराजी

03:21 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
बेतोडा ग्रामविकास समितीच्या विलंबित बैठकीबद्दल नाराजी
Advertisement

वार्ताहर /दाभाळ

Advertisement

बेतोडा निरंकाल कोनशे कोडार पंचायतीच्या ग्राम विकास समितीची बैठक तब्बल एक वर्षाने घेण्यात आल्याने ग्राम विकास समितीच्या सदस्यांनी संताप व्यक्त करीत समितीचे निमंत्रक असलेल्या सरपंचाकडे त्याबाबत स्पष्टीकरण मागितले. सरपंच त्यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. यापुढे समितीची बैठक दर तीन महिन्यांनी घेण्यात यावी अशी जोरदार मागणी सदस्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केली व तसा ठराव घेण्यात आला. सरपंच मधू खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच चित्रा सालेलकर पंचसदस्य उमेश गावडे, चंद्रकांत सामंत, अक्षय गांवकर, प्रशांत गांवकर, दुर्गाप्रसाद वैद्य, विद्या गांवकर, वैशाली सालेलकर, गीता गावडे, निमंत्रक अशोक नाईक व समितीचे सदस्य उपस्थित होते.

पंचायतीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम विकास समितीच्या बैठका वेळोवेळी होणे गरजेचे आहे. पंचायत क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या नियोजित विकासकामांचा आराखडा ग्राम समितीच्या बैठकीत निश्चित केला जातो व त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे ग्रामविकास समितीची बैठक घेण्यास टाळाटाळ करणे हे चुकीचे असून तसे झाल्यास पंचायतीच्या विकास कामांना चालना मिळणे कठीण होऊन बसेल असे समितीच्या सदस्यांनी सूचित केले. नियोजित विकासकामांचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेण्यासाठी समितीची बैठक तीन महिन्यांनी घ्यावी असे सूचित करण्यात आले. समितीच्या मागील बैठकीत निश्चित केलेल्या 31 कामांपैकी केवळ 9 कामे मार्गी लागल्याबद्दल सदस्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. उर्वरीत  कामाना त्वरित चालना मिळवून द्यावी अशी मागणी केली. प्रत्येक प्रभागात एक एक काम हाती घेण्याचे ठरले. बैठकीत झालेल्या चर्चेत ग्राम विकास समिती सदस्य बाबुसो गांवकर, हेमंत सामंत, प्रज्योत गांवकर, सत्यवान सालेलकर, रामदास गांवकर, नेहा वेळीप यांनी भाग घेतला.

Advertisement

Advertisement
Tags :

.