For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नोव्हेंबरपासून फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसणे बंधनकारक

07:00 AM Oct 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
नोव्हेंबरपासून फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसणे बंधनकारक
Advertisement

हि सेवा 1 नोव्हेंबर 2026 पासून सुरु करण्याचे ट्रायचे दूरसंचार

Advertisement

नवी दिल्ली : जेव्हा कोणी तुमच्या फोनवर कॉल करेल, तेव्हा त्या व्यक्तीचा नंबर आणि नाव दोन्ही क्रीनवर दिसतील. ज्या आयडीवरून सिम खरेदी केले होते, तेच नाव दिसेल. यामुळे बनावट कॉल ओळखण्यास मदत होईल. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना 1 नोव्हेंबर 2026 पासून ही सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारने कॉलिंग संदर्भात कोणता नवीन नियम जारी केला?

Advertisement

सरकारने कंपन्यांना 1 नोव्हेंबर 2026 पासून सर्व 4जी आणि 5जी मोबाईल नेटवर्कवर ‘कॉलिंग नेम प्रेझेंटेशन“ अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जेव्हा अनोळखी नंबरवरून कॉल येईल, तेव्हा फोन क्रीनवर कॉलरचा नंबर आणि नाव दिसेल.

कोणी कॉल करेल, तेव्हा फोन क्रीनवर नाव आणि नंबर कसे दिसतील?

ज्याने तुम्हाला कॉल केला आहे, त्याचे नाव तुमच्या मोबाईल क्रीनवर दिसेल. जर कॉल करणाऱ्याचे नाव तुमच्या संपर्क यादीत असेल, तर तेच नाव दिसेल. जर त्याचा नंबर सेव्ह केलेला नसेल, तर सिम घेताना कॉल करणाऱ्याने जे नाव टाकले होते ते दिसेल.

परदेशातून कोणी कॉल करत असेल, तर?

जर कॉल दुसऱ्या देशातून येत असेल, म्हणजेच आंतरराष्ट्रीय नंबर असेल, तर क्रीनवर फक्त आंतरराष्ट्रीय कॉलचेच नाव दिसेल.

Advertisement
Tags :

.