संशयाचे धुके आणि ढग दूर?
विक्रम मिस्त्री यांच्या ढाका दौऱ्यामुळे उभय देशातील संशयाचे धुके बरेचसे दूर होण्यास मदत झाली आहे. तसेच अनिश्चिततेचे ढगही आता हळूहळू मागे जात आहेत. विक्रम मिस्त्राr यांनी बांगलादेश सरकारला ठणकावून सांगितले. त्यामुळे सरकारने 5 ऑगस्ट नंतर प्रथमच कारवाई करून गुह्यांची नोंद घेतली. आता पुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून भारत सरकारकडून ठोस कृती आवश्यक आहे असे विचारवंत सुनील आंबेकर यांचे मत आहे.
आपला शेजारी बांगलादेश एक सच्चा मित्र. परंतु मागील 5 ऑगस्टपासून तेथे घडलेल्या घटनांचे आकलन आणि विश्लेषण करणे अत्यंत आवश्यक आहे. बांगलादेशच्या जन्माची कहाणी म्हणजे शोषणाची कहाणी आहे. पश्चिम पाकिस्तानने पूर्वेचे सर्व प्रकारे शोषण केले. या विरुद्ध मुक्ती वाहिनी स्थापन करून वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांनी बांगलादेश मुक्तीची चळवळ सुरू केली. त्यामुळे पाकिस्तानचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोलमडून पडला. 1971 साली इंदिरा गांधींच्या दूरदृष्टीमुळे बांगलादेश मुक्त झाला. परंतु 1971 ते 2024 या वाटचालीत अवामी लीगच्या मुजीबुर रहमान यांच्या कन्या शेख हसीना यांची तिसरी कारकीर्द वादळी ठरली. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकरीत 30 टक्के आरक्षण घोषित केल्यानंतर तेथील ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. त्याला हिंसक वळण लागले. परदेशात प्रशिक्षण घेतलेल्या बंडखोरांनी असंतोषाची आग पेटविली. त्यातून शेख हसीना यांना भारताचा आश्रय घ्यावा लागला.
5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर आतापर्यंत बांगलादेशात अनेक हिंदू मंदिरे तसेच प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले आहेत. 80 पेक्षा अधिक हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. 11 ख्रिश्चन प्रार्थनास्थळांवर आक्रमणे करण्यात आली. शिवाय बौद्ध आणि जैन मंदिरांवरही हल्ले झाले. त्याचबरोबर अल्पसंख्यांकांच्या मालमत्तेवरसुद्धा अत्यंत क्रूरपणे हल्ले करण्यात आले. या सर्व घटनांचा भारतामध्ये तीव्र निषेध झाला. एवढेच नव्हे तर जगभरातील अनेक लोकशाहीवादी देशांनी या कृत्याचा निषेध केला. अमेरिकचे प्रवत्ते मॅथ्यू मिलर यांनी भारत व बांगलादेश या उभयतांनी परस्परातील प्रश्न चर्चा व विचार विनिमयाने सोडवावेत असे यथार्थ आवाहन केले आहे. खुद्द लोकशाहीची जननी असलेल्या इंग्लंडमधील हाउस ऑफ कॉमन्स या संसदेच्या खालच्या सभागृहात त्यावर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्राr यांची ढाका भेट समयोचित, अत्यंत महत्त्वाची आणि मुत्सद्देगिरीच्यादृष्टीने तेवढीच चतुराईची ठरली आहे.
प्रमुख वैशिष्ट्यो कोणती?
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्राr यांच्या ढाका भेटीची तीन प्रमुख वैशिष्ट्यो आहेत. पहिली बाब म्हणजे त्यांनी आपल्या कूटनीतीक चर्चेमध्ये लोक संपर्कावर भर दिला. प्रश्न एखाद्या नेत्याच्या पदच्युतीचा किंवा नव्याच्या पुनरागमनाचा नाही, एखाद्या राजकीय पक्षाचा नाही. प्रश्न आहे तो उभय देशामधील लोकांच्या विकासाचा, सहकार्याचा आणि मैत्रीचा. दुसरा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडला तो विकासाचा. उभय राष्ट्रामध्ये विकासाचे प्रकल्प हे चालू राहिले पाहिजेत कारण या प्रकल्पातून दोन्ही देशातील जनतेच्या कल्याणाची हमी प्राप्त झाली आहे. त्यामुळे या संदर्भात त्यांनी विविध विकास करारांच्या पालनाची जबाबदारी प्रामुख्याने अधोरेखित केली. तिसरे म्हणजे अल्पसंख्यांक समुदायावर झालेल्या हल्ल्याबाबत तेथील सरकारने मूक गिळून बसू नये, काहीतरी ठोस कारवाई करावी याबद्दल त्यांनी आग्रह धरला. झाल्या प्रकाराबद्दल भारताकडून चिंता व्यक्त केली आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा योग्य ती कारवाई करण्याची हमी देण्यात आली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्राr यांनी 9 डिसेंबर रोजी बांगलादेशचे पंतप्रधान म. मोहम्मद युनूस आणि तेथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सल्लागार तौहीद हुसेन यांची भेट घेऊन सल्ला मसलत केली. विक्रम मिस्त्राr महोदयांनी बांगलादेश सरकारबरोबर लोकशाही, स्थिर शासन, शांततापूर्ण, प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विकासासाठी भारताच्या समर्थनावर विशेष भर दिला. परस्पर विश्वास, सौहार्द, आदरभाव, एकमेकांच्या चिंता व हितसंबंधाचे रक्षण याबाबत परस्पर संवेदनशीलतेवर आधारित चर्चेला गती दिली.
ही चर्चा करताना त्या आधारे सकारात्मक आणि रचनात्मक संबंध निर्माण करण्यावर भर देण्यात आला. भारताच्या उच्च ध्येयवादाचे व सकारात्मक इच्छाशक्तीचे महत्त्व प्रतिबिंबित करून त्यांनी परस्पर संवाद तत्त्वाचा पुनरुच्चार केला. लोक हे परस्पर विकासाचे आधारभूत व केंद्रीभूत घटक आहेत आणि त्यामुळे आपण लोकाभिमुख धोरणाचा आदर केला पाहिजे हे सूत्र त्यांनी प्रकर्षाने मांडले. उभय देशातील संबंधात बहुआयामी प्रतिबद्धता, संपर्क (कनेक्टिव्हिटी), व्यापार, ऊर्जा आणि क्षमता संवर्धन या क्षेत्रातील परस्पर सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या दौऱ्यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्राr यांनी अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त केली आणि या कालखंडात धार्मिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक मालमत्तांचे जे नुकसान झाले त्याकडे सरकारचे लक्ष वेधले. या सर्व बाबतीत बांगलादेश सरकारने सत्वर कृती करून सुरक्षिततेची हमी द्यावी असा आग्रहही मिस्त्राr यांनी धरला.
खरा लगाम विकासाला?
बांगलादेशातील मूलतत्त्ववाद्यांनी केलेल्या गोंधळामुळे खरे नुकसान बांगलादेशचे होत आहे. त्यांचा विकास दर त्यामुळे मागे पडण्याची शक्यता आहे. हिंसक कारवाया आणि धर्मस्थळांवरील हल्ले यामुळे तेथील विकास पर्यावरण गढूळ झाले आहे. एकूणच देशातील व्यवसाय, रोजगार हे मंदावले आहेत. बांगलादेशमधील अतिरेकी गट हे स्वत:च्या पायावर दगड टाकून घेत आहेत. एकूणच सुरक्षा, सीमा व्यवस्थापन, व्यापार, वाणिज्य, लोक संपर्क, ऊर्जा, पाणी या क्षेत्रातील सहकार्याला अशा तणावामुळे बाधा उत्पन्न होऊ शकते. उभय अधिकाऱ्यांच्या पातळीवरील चर्चेचा सूर अत्यंत सकारात्मक आणि परस्पर हिताचा असा होता. प्रादेशिक आणि उपप्रादेशिक दृष्टीने विविध मुद्यांवर सामाजिक व सांस्कृतिक हिताच्या दृष्टीने विचार करण्यात आला. तणावपूर्ण परिस्थितीमुळे लोक संपर्कावर कसा प्रतिकूल परिणाम होतो, त्यातून विकासाचे प्रकल्प कसे मागे पडण्याचा धोका आहे हे सुद्धा उभय पक्षांच्या लक्षात आले आहे. भारताने विकसित केलेल्या बिमस्टेक (ँघ्श्एऊण्)िं या चौकटीमध्ये बांगलादेशच्या विकास व स्थैर्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत ही चौकट विकसित करण्यात येणाऱ्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले. आता गरज आहे ती अंतर्गत प्रादेशिक एकात्मता पुढे नेण्याची. कारण अशा प्रादेशिक एकात्मतेवरच सर्वसमावेशक विकासाची मदार अवलंबून असते. बांगलादेशने भारताच्या पूर्वेकडील राज्यांना गतिमान इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी तांत्रिक सहकार्य केले पाहिजे. त्या उलट हा देश चीन व म्यानमारला इंटरनेट सेवांसाठी मदत करीत आहे आणि भारताला मात्र गाजर दाखवित आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
महत्त्वाचे फलित काय?
विक्रम मिस्त्राr यांच्या ढाका भेटीचे महत्त्वाचे फलित काय असेल तर बांगलादेश सरकारने अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांच्या बाबतीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर कारवाईस सुरूवात केली आहे. 5 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर दरम्यान धार्मिक स्थळांवर 88 पेक्षा अधिक हल्ले झाले. त्यामध्ये दोषींवर कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव मिस्त्राr यांचा दौरा आणि भारतातील हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाचा दबाव यामुळे बांगलादेश सरकारने अल्पसंख्यांकांच्या मंदिरांवर हल्ले झाल्याची प्रथमच कबुली दिली. 88 गुन्हे नोंदविण्यात आले आणि 70 जणांना अटक करण्यात आली. 5 ऑगस्टच्या घटनाक्रमानंतर ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. मोहम्मद युनूस यांचे वृत्तपत्र सचिव शफीकुल आलम यांनी या बाबतीत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या सर्व घटना बांगलादेशच्या इशान्येकडे आणि मध्य बांगलादेशमध्ये घडून आल्या आहेत. हल्ले वैयक्तिक वादातून आणि राजकीय पक्षाच्या स्पर्धेतून झाले असा शोधही सरकारी निवेदनात लावला आहे. धार्मिक असहिष्णुता आणि राजकीय स्थित्यंतरातील तणाव ही या संघर्षाची कारणे असल्याचे बांगलादेश सरकारचे म्हणणे आहे.
या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की, विक्रम मिस्त्राr यांच्या ढाका दौऱ्यामुळे उभय देशातील संशयाचे धुके बरेचसे दूर होण्यास मदत झाली आहे. तसेच अनिश्चिततेचे ढगही आता हळूहळू मागे जात आहेत. परंतु विचारवंत सुनील आंबेकर यांनी म्हटल्याप्रमाणे, आता नुसत्या चर्चेने भागणार नाही तर ठोस कारवाईची सुद्धा आवश्यकता आहे. विक्रम मिस्त्राr यांनी या संदर्भात बांगलादेश सरकारला ठणकावून सांगितले. त्यामुळे सरकारने 5 ऑगस्ट नंतर प्रथमच कारवाई करून गुह्यांची नोंद केली आणि 70 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली.
आता इस्कॉन मंदिराचे प्रमुख वैष्णव साधू चिन्मय कृष्ण दास यांच्यावर झालेली कारवाई सुद्धा अनैतिक व अयोग्य असून त्यांना कायदेशीर प्रक्रियेतून सामोरे जाण्यास योग्य वातावरण तयार करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास उभय समुदायातील तणाव कमी होईल आणि वातावरण पूर्ववत होण्यास मदत होईल. संशयाचे धुके दूर झाले, ढगही मागे हटत आहेत पण आता गरज आहे ती ठोस कृतीची आणि त्याआधारे चांगल्या भविष्याची हमी देण्याची. विक्रम मिस्त्राr यांच्या दौऱ्यामुळे उभय देशातील तणावग्रस्त वातावरण शांत होण्यास एक पहिली पायरी म्हणून सुरूवात झाली आहे. या दृष्टीने एक चांगला प्रारंभ मिस्त्राr यांच्या दौऱ्यामुळे झाला आहे असे म्हणावे
लागेल.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर