महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राज्यातील सीडी सरकार बरखास्त करा

10:28 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निजदचे चन्नम्मा चौकात आंदोलन : उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन

Advertisement

बेळगाव : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बनावट सीडीच्या माध्यमातून राजकारण्यांना ब्लॅकमेलिंग करत आहेत. निजद नेते रेवण्णा यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना राजकीय द्वेषातून प्रकरणात अडकविण्यात आले आहे. यामागे डी. के. शिवकुमार यांचे षड्यंत्र असून त्यांना काँग्रेसमधून पदच्युत करण्यात यावे. तर राज्यातील सीडी सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी करत निजद नेते शंकर माडलगी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौकात आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला. शिरस्तेदार एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सीडी फॅक्टरी चालवत आहेत. राज्यातील राजकारण्यांना ब्लॅकमेलिंग करीत आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याबाबत व्हायरल झालेल्या सीडी प्रकरणात ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हावी, असे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, रेवण्णा यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आले आहे.

Advertisement

एसआयटी पथकही बनले सरकारच्या हातातील बाहुले

राज्य सरकारने सीडी प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेले एसआयटी पथकही सरकारच्या हातातील बाहुले आहे. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून निजद नेत्यांना हेतूपूर्वक या प्रकरणात गोवले जात आहे. राजकीय द्वेषातूनच हे कारस्थान रचले जात आहे. यामागे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा हात असल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वी झालेल्या सीडी प्रकरणामध्येही त्यांचाच हात आहे. सावकारांना अडकविण्यात तेच कारणीभूत आहेत, असा आरोपही निजद नेत्यांकडून करण्यात आला.

सरकार बरखास्त करण्याची मागणी

डी. के. शिवकुमार यांचे संभाषण व्हायरल झाले असून, एक लाख सीडी असल्याचे संभाषणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार सीडी सरकार आहे. सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एसआयटीकडे प्रकरण देण्यात आले असले तरी सदर यंत्रणा सरकारच्या निर्देशानुसार काम करत आहे. यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची प्रतिमादहन करण्यात आले. यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article