For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा कायदेशीर धक्का; 500 कोटींच्या मानहानीची नोटीस

05:55 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा कायदेशीर धक्का  500 कोटींच्या मानहानीची नोटीस
Advertisement

मुंबई : दिवंगत दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना तिचे वडील सतीश सालियन यांनी 500 कोटी रुपयांच्या मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये बिनशर्त जाहीर माफी तसेच 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

सतीश सालियन यांनी मुंबईतील कलानगर येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर जाऊन ही नोटीस दिली. आदित्य ठाकरे यांच्या कायदेशीर प्रतिनिधींनी नोटीस स्वीकारली. नोटीसमध्ये करण्यात आलेल्या मागण्या सात दिवसांत पूर्ण करण्याची मागणी असल्याचे वृत्त आहे.

दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर होती. तिच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात सतीश सालियन यांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या प्रयत्नांना राजकीय हेतू असल्याचे चित्र निर्माण करणारी वक्तव्ये करण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी नोटीसमध्ये घेतला आहे.

Advertisement

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी दिशा सालियनला आपण ओळखत नसल्याचे आणि तिच्याशी आपली कधीही भेट झाली नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणाशी आपले नाव जोडणे हा चारित्र्यहननाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते.

या प्रकरणात सतीश सालियन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवल्याचे वृत्त आहे. प्रकरणातील विविध आरोप आणि दावे सध्या कायदेशीर प्रक्रियेत असून त्याबाबतचे अंतिम निष्कर्ष संबंधित तपास व न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहेत.

Advertisement
Tags :

.