For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात अखेर FIR; आदित्य ठाकरे, सूरज पांचोलींसह अनेकांची नावे

07:30 PM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात अखेर fir  आदित्य ठाकरे  सूरज पांचोलींसह अनेकांची नावे
Advertisement

मुंबई: मुंबईतील दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला पुन्हा एकदा मोठे वळण मिळाले आहे. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. या FIR मध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता सूरज पांचोली यांच्यासह अन्य काही व्यक्तींची नावे असल्याचे सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी सांगितले.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी CBI ने सतीश सालियान यांचा जबाब नोंदवला. सुमारे चार तास ही प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर दिशा सालियान यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात FIR दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनेक गंभीर आरोपांचा उल्लेख

वकील निलेश ओझा यांच्या म्हणण्यानुसार, दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये बलात्कार, हत्या तसेच पुरावे दडपण्यासंदर्भातील आरोपांचा समावेश आहे. भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार पुढील तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, FIR मध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि डिनो मोरिया यांच्यासह रिया चक्रवर्ती, परमबीर सिंह, रोहन रॉय, सचिन वाझे, इमारतीतील सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर संजय यादव यांसारख्या व्यक्तींची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

;

दिशा सालियानकडे पुरावे असल्याचा दावा

दिशा सालियान यांच्याकडे काही महत्त्वाची माहिती आणि पुरावे होते, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. ही माहिती सुशांत सिंह राजपूत यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि त्यानंतर कथित कट रचण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या दाव्यांबाबत अधिकृत तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

२०२० मध्ये झाला होता मृत्यू

८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून दिशा सालियान यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचा मुंबई पोलिसांनी तपास केला होता आणि प्राथमिक निष्कर्षांनुसार आत्महत्येचा दावा करण्यात आला होता.

दरम्यान, मार्च २०२५ मध्ये सतीश सालियान यांनी आपल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर प्रकरणाच्या तपासासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. आता FIR दाखल झाल्याने या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.