हॉलिवूड पदार्पणासाठी दिशा सज्ज
विदेशी सुपरनॅचरल थ्रिलरमध्ये एंट्री
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आता हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यास तयार आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोन, अली फजल आणि अनुपम खेर यासारख्या कलाकारांप्रमाणे आता दिशा पाटनी देखील हॉलिवूडमध्ये स्वत:ची क्षमता सिद्ध करू पाहत आहे. ऑस्करविजेते केविन स्पेसी यांच्या दिग्दर्शनात तयार होणार सुपरनॅचरल थ्रिलरपट ‘हॉलिगार्ड सागा : द पोर्टल ऑफ फोर्स’मध्ये दिशा दिसून येणार आहे.
पाश्चिमात्य देशांमधील चित्रपट ऑडिशनवर प्रामुख्याने निर्भर असतो. तेथे काम मिळविण्यासाठी आम्हाला ऑडिशन द्यावी लागते. यात कधीकधी ते तुमचे पूर्वीचे काम पाहतात आणि तुम्हाला प्रोजेक्ट किंवा ऑडिशनचा प्रस्ताव देत असतात. परंतु तेथे काम मिळणे व्हिसा आणि इतर साधनांच्या उपलब्धतेवर निर्भर असते. अखेर तो वेगळा देश असतो आणि संधीवेळी तेथे हजर असावे लागते. भारतात बसून तेथील चांगल्या भूमिका मिळविता येत नाहीत. ऑनलाइन ऑडिशन देता येते, परंतु तेथे जात काम करणे सर्वात चांगले असल्याचे दिशाने सांगितले आहे.
दिशा अलिकडेच अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटात दिसून आली आहे. तर आगामी काळात ती ‘आवारापन 2’मध्ये दिसून येणार असून यात तिच्यासोबत इमरान हाश्मी असणार आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.