शाहिदसोबत झळकणार दिशा पाटणी
विशाल भारद्वाज यांचा चित्रपट
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा शाहिद कपूरसोबतचा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहे. शाहिदच्या या चित्रपटासाठी नायिका आता ठरली असून याची घोषणा विशाल भारद्वाज यांनीच केली आहे. भारद्वाज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून यात त्यांच्यासोबत दिशा पाटनी दिसून येत आहे. अत्यंत सुंदर अभिनेत्री दिशा पाटनीसाठी विशेषकरून एक खास कॅमियो लिहिला आहे. चित्रपटासोबत दिशा पाटनीला जोडण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे भारद्वाज यांनी म्हटले आहे. दिशा पाटनी या चित्रपटात आयटम नंबर करताना दिसून येऊ शकते. याच्या माध्यमातून दिशा आणि शाहिद ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विशाल भारद्वाज यांनी शाहिदसोबत कमीने, हैदर आणि रंगून यासारखे चित्रपट केले आहेत. यातील पहिले दोन चित्रपट यशस्वी ठरले आहेत. तर आता चौया चित्रपटासाठी दोघेही परस्परांसोबत आले आहेत. विशालचा हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे मानले जात आहे. विशाल भारद्वाज हे कलात्मक चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांचा वेगळा असा एक चाहतावर्ग आहे.