‘आवारापन 2’मध्ये दिशा पाटनी
इमरान हाश्मीसोबत जमणार जोडी
‘दर्द से मेरा पुराना रिश्ता है’ या डायलॉगसोबत अभिनेता इमरान हाश्मी पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येतोय. इमरान पुन्हा एकदा स्वत:च्या लवर एरायुक्त इमेजसोबत परतणार आहे. ‘आवारापन 2’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून तो अत्यंत रंजक वाटत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये इमरानची जुनी शैली पुन्हा दिसून येत आहे. याच शैलीमुळे त्याच्या चाहत्यांची संख्या पूर्वी वाढली होती. प्रेम, दु:ख आणि अॅक्शनच्या कॉकटेलने सजलेल्या या टीझरची सुरुवात आकर्षक डायलॉगने होते, ज्यात इमरान हा ‘कुछ लोगों की कहानियां उनकी मर्जी से खत्म नही. होतीं... उनकी कहानी दुसरे लोगों के लिए लिखी जाती है’ असे म्हणत असल्याचे दिसून येते. या चित्रपटात दिशा पाटनी आणि श्रिया सरन यांची महत्त्वाची भूमिका आहे. दिशा पाटनी यात इमरानची लव इंट्रेस्ट म्हणून दिसून येणार आहे. चित्रपटात शबाना आझमी देखील दिसून येणार आहेत. त्या या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाची निर्मिती विशेष भट्ट यांनी केली आहे. तर दिग्दर्शन नितिन कक्कड यांनी केले आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.