हॉलिवूडपटात दिशा पाटनी
द पोर्टल ऑफ फोर्सचा ट्रेलर जारी
अभिनेत्री दिशा पाटनी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘द पोर्टल ऑफ फोर्स“चा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. या चित्रपटात केविन स्पेसी, टायरेस गिब्सन आणि डॉल्फ लुंडग्रेन मुख्य भूमिकेत आहेत. हा प्रोजेक्ट लाडो ओखोटनिकोव्हकडून निर्मित स्टॅडिगार्डस व्हर्सेस होलिगार्ड्स सागाशी संबंधित आहे. ट्रेलरमध्ये दिशा ही जेसिका या भूमिकेत दिसून येते, जी दोन प्राचीन गट स्टॅटिगार्ड्स आणि होलिगार्ड्सदरम्यान अडकून पडली आहे. या दोन्ही समुहांदरम्यान दीर्घकाळापासून चालत आलेल्या संघर्षाच्या अवतीभवती ही कहाणी घुटमळते. चित्रपटाच्या कहाणीनुसार जेसिका दोन्ही दोन्ही गटांच्या प्रतिस्पर्धी नेत्यांची मुलगी आहे आणि युद्ध तसेच मानवतेच्या भाग्याचा निर्णय घेण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
मी या अत्यंत खास प्रोजेक्टच्या ट्रेलरची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. स्वत:च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये पाऊल ठेवणे रोमांचक आणि भीतीदायक दोन्ही होते, परंतु स्वत:च्या क्षमतेला सिद्ध करण्याची ही मोठी संधी देखील होती. अनुभवी कलाकारांसोबत काम करणे खरोखरच एक शिकवण होती. कहाणी मांडण्याची कला भाषा आणि भूगोलापलिकडे असल्याची जाणीव यातून होते. मला नेहमीच अॅक्शन पसंत राहिली असून स्वत:च्या देशात शिकलेली कला जागतिक व्यासपीठावर आणणे अत्यंत सशक्त जाणीव करून देते, असे दिशाने म्हटले आहे.