तलविंदर सिंहला डेट करतेय दिशा
व्हायरल झाला व्हिडिओ
अलिकडेच नुपूर सेनॉन या अभिनेत्रीचा विवाहसोहळा पार पडला असून यात अनेक दिग्गज कलाकार सामील झाले. परंतु यादरम्यान दिशा पाटनी आणि गायक तलविंदर सिंह यांच्यातील केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोहळ्यात दिशा पाटनी आणि मौनी रॉय यांची मैत्री दिसून आली, परंतु येथे तलविंदरसोबत दिशाची खास बॉन्डिंग दिसून आली, ज्याची चर्चा आता सोशलमीडियावर होत आहे.
दिशा आणि तलविंदर हे परस्परांसोबत संभाषण करताना दिसून आले असून यावेळी दिशा तलविंदरचा हात हातात घेऊन असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. तलविंदर हा पहिल्यांदाच मुखवट्याशिवाय दिसून आल्याने देखील त्याचे चाहते चकित झाले आहेत. यात त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत आहे.
तलविंदर सिंह हा प्रख्यात पंजाबी गायक आहे. अलिकडेच त्याने कार्तिक आर्यनच्या चित्रपटातील एका गाण्याला आवाज दिला होता, ज्याला मोठी पसंती मिळाली होती. इंटरनेटवर तलविंदरची मोठी फॅन फॉलोइंग असून आता दिशाचे नाव त्याच्यासोबत जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी दिशाला एका कारमध्ये एका मिस्ट्री मॅनसोब पाहिले गेले होते, ज्यात त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला नव्हता.