हवाईक्षेत्राच्या वापरावरून चीनसोबत चर्चा
पाकिस्तानच्या बंदीदरम्यान पर्यायी मार्गाचा शोध
► वृत्तसंस्था, नवी दिल्ली
शिनजियांग हवाईक्षेत्राला भारतीय एअरलाइन्ससाठी पर्यायी मार्ग करण्याच्या उद्देशाने चीनसोबत भारत सरकार चर्चा करत आहे. ही चर्चा जवळपास एक वर्षापासून सुरू असून विदेश मंत्रालय देखील या मुद्द्यावर सक्रीय आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे विमान इंधनाच्या किमतीतील वृद्धीने एअरलाइन्सचा खर्च वाढला असताना हा पर्यायी मार्ग भारतीय एअरलाइन्ससाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
भारत खासकरून चीनच्या शिनजियांग हवाईक्षेत्राचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहे. पाकिस्तानी हवाईक्षेत्रावरील निर्बंधांमुळे भारत सरकार सध्या पर्यायी हवाईमार्गाचा शोध घेत आहे. शिनजियांग हवाईक्षेत्रावरून चीनसोबतची भारताची चर्चा सुमारे एक वर्षापासून सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानने स्वत:चे हवाईक्षेत्र वापरण्यावर बंदी घातल्याने भारतीय ऑपरेटर्सना युरोप आणि अमेरिकेसाठी स्वत:च्या आंतरराष्ट्रीय विमानो•ाणांकरता दीर्घ मार्ग वापरावे लागत आहेत. यामुळे भारताचा विमानो•ाणांचा संचालनात्मक खर्च वाढला आहे.
एअरलाइन्सच्या खर्चात वाढ
पश्चिम आशियातील संघर्षामुळे एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (एटीएफ) म्हणजेच विमान इंधनाची किंमत वाढली आहे. यामुळे देखील एअरलाइन्सच्या संचालन खर्चावर प्रभाव पडला आहे. अशास्थितीत चीनचा पर्यायी हवाईमार्ग पाकिस्तानी हवाईक्षेत्र वापराच्या बंदीमुळे प्रभावित भारतीय एअरलाइन्सना काही प्रमाणात दिलासा देऊ शकतो. भारत होटानवरून संभाव्य हवाईमार्गाची शक्यता पडताळून पाहत आहे. विदेश मंत्रालय याप्रकरणी स्वत:च्या चिनी समकक्षांसोबत चर्चा करत आहे.