महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभाध्यक्षपदासंबंधी रालोआत चर्चा

06:51 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मित्र पक्षांशी वाटाघाटी करण्यासाठी भाजपकडून राजनाथसिंग यांची नियुक्ती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय पक्षांनी हालचालींना प्रारंभ केला आहे. भारतीय जनता पक्ष हे महत्त्वाचे पद आपल्याकडे ठेवू इच्छित आहे. मात्र, या पक्षाकडे स्वत:चे बहुमत नसल्याने मित्रपक्षांच्या सहकार्यावर त्याला अवलंबून रहावे लागणार आहे. मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांची नियुक्ती केली आहे. 26 जूनला या पदासंबंधीचा निर्णय होणार आहे. 24 जूनपासून नव्या लोकसभेच्या प्रथम अधिवेशनाचा प्रारंभ होत आहे.

कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर बहुमत नसल्याने लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सर्वात मोठा आणि बहुमताच्या जवळपास असणारा पक्ष आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या स्थिरतेसाठी हे पद आमच्याकडे राहिले तर उत्तम होईल, अशी या पक्षाची भूमिका आहे.

चोवीस तास आधी उमेदवारी

लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची वेळ आजवर आलेली नाही. तथापि, यावेळी तसे होण्याची शक्यता आहे. निवडणूक घेणे अनिवार्य ठरल्यास ती 26 जूनला होणार आहे. नव्या लोकसभेच्या ज्या सदस्यांना या पदासाठी स्पर्धा करायची आहे, ते निवडणुकीच्या आधी 24 तास, अर्थात 25 जूनला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करु शकतात. त्यांना अनुमोदन आणि समर्थन देणारे पक्ष किंवा सदस्यही त्यांची समर्थन पत्रे याच कालावधीत सादर करु शकतात.

मागणीचे वृत्त निराधार

लोकसभेचे अध्यक्षपद आम्हाला द्यावे, अशी मागणी तेलगु देशम किंवा संयुक्त जनता दलाने केली असल्याची वृत्ते निराधार आहेत, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट पेले आहे. या विषयावर प्रथम आमच्या पक्षात अंतर्गत चर्चा होईल. नंतर मित्रपक्षांशी विचारविनिमय करुन सर्वसहमतीने या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाईल. सत्ताधारी आघाडीत यासंबंधाने कोणतेही मतभेद नाहीत, असे भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

संजदचा भाजपला पाठिंबा

सत्ताधारी आघाडीत जो पक्ष सर्वात मोठा आहे, त्या पक्षाचा सदस्य लोकसभेचा अध्यक्ष असल्यास ते अधिक सोयीचे होईल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्या नेत्याची निवड करेल, त्याला पाठिंबा संयुक्त जनता दलाचा पाठिंबा असेल, असे या पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. तर तेलगु देशमचे नेते आणि प्रवक्ते पट्टाभी राम कोमारे•ाr यांनी या विषयावर सत्ताधारी आघाडीतील सर्व पक्षांची एकत्र चर्चा होण्यावर भर दिला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व प्रमुख पक्षाचे नेते एकत्र चर्चा करतील आणि सहमतीने नाव निश्चित करतील, असे प्रतिपादन त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे. त्यामुळे एक आठवड्यात यासंबंधी सहमती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरंदेश्वरी यांचे नाव आघाडीवर

आंध्र प्रदेशमधून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार दिग्गुबती पुरंदेश्वरी यांचे नाव या पदासाठी प्रामुख्याने चर्चेत आहे. त्या तेलगु देशमचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला तेलगु देशमकडून समर्थन मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कोणताही वाद निर्माण न होता, या पदासाठी निवड होईल, अशी चर्चा आहे. विरोधी पक्षांनी आपला उमेदवार देण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात प्रथमच या पदासाठी निवडणूक होण्याचा संभवही नाकारता येत नाही, असे तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article