सावंतवाडीत ४ रोजी शक्तीपीठ महामार्गविरोधी चर्चासत्र
माजी खासदार राजू शेट्टींसह, आमदारांची उपस्थिती
सावंतवाडी । प्रतिनिधी
वर्धा ते पत्रादेवी असा नियोजित शक्तीपीठ महामार्ग १२ जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावातून हा हायस्पीड महामार्ग जाणार आहे. जिल्ह्यातून १३ गावातून सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुडवत हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी जंगलतोड होणार आहे. शक्तिपीठ महामार्गाबाबत बोगदा असणार आहे असे भासवले जात आहे आणि लपवालपवी केली जात आहे. शक्तिपीठ आणि पर्यावरण या संदर्भात चर्चासत्र येत्या 4 नोव्हेंबरला सावंतवाडी येथे काझी शहाबुद्दीन हॉल येथे सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. शक्तिपीठ व पर्यावरण याविषयी चर्चासत्रामध्ये १३ गावातील शेतकरी बांधव तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी ,आमदार सत्तेज उर्फ बंटी पाटील आधी मराठवाडा ,विदर्भ भागातील नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत शक्तिपीठ महामार्ग बचाव समितीचे डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी दिली .