आजपासून तीन दिवस उत्तर कर्नाटकावर चर्चा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
प्रतिनिधी/ बेंगळूर
अधिवेशनात सोमवारपासून बुधवारपर्यंत तीन दिवस उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा केली करून समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. गदग जिल्ह्याच्या रोण हेलिपॅडवर पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. वक्फ प्रकरणात बी. वाय. विजयेंद्र यांनी 150 कोटींचे आमिष दाखविल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मानप्पाडी यांनी त्यांच्या स्वत:च्या व्हिडिओमध्ये दिलेल्या विधानाच्या आधारे केंद्राला पत्र लिहिले आहे. सीबीआयने चौकशी केल्यास काँग्रेसचे सदस्य पकडले जातील, या भाजपच्या आरोपाबाबत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना, तसे असेल तर सीबीआय चौकशी करू देत. व्हिडिओतील आवाज मानप्पाडी यांचा आहे की नाही हे मीडियाला चांगलेच माहीत आहे, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.