पंतप्रधान मोदी अन् योगी आदित्यनाथांमध्ये चर्चा
उत्तरप्रदेश भाजप अध्यक्ष, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा चर्चेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींसोबत योगींनी उत्तरप्रदेश भाजप अध्यक्षाच्या नावावर चर्चा केली. तसेच उत्तरप्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून दोघांनी चर्चा केली आहे. दोघांच्या चर्चेत महाकुंभच्या यशस्वी आयोजनाचा मुद्दाही सामील होता.
यापूर्वी शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांची भेट घेतली होती. न•ा आणि योगी यांच्यात दीर्घ चर्चा झाली होती. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड आणि आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा केली होती. योगींनी भाजप अध्यक्ष न•ा यांना महाकुंभचे कॉफी टेबल प्रदान केले होते.
काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे हे लखनौ येथे पोहोचले होते. तावडे यांनी त्या दौऱ्यात योगींसोबत मंत्रिमंडळ विस्तारावरून संभाव्य नावांवरून चर्चा केली होती.
भेटीगाठी महत्त्वपूर्ण
योगी आदित्यनाथ यांच्या या दिल्लीतील दौऱ्यात झालेल्या भेटीगाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. उत्तरप्रदेश समवेत देशाच्या अन्य हिस्स्यांमध्ये भाजपची संघटनात्मक निवडणूक सध्या सुरू आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. तसेच राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली जाणार नाहे.
मंत्रिमंडळ विस्तार होणार
उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळाल्यावर योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मानले जात आहे. यादरम्यान काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटविले जाऊ शकते तर काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. तर अनेक नेत्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे मानले जात आहे.